NEET EXAM पेपरफुटी प्रकरणी पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

NEET परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मनिषा वाघमारे (46) असे त्या महिलेचे नाव असून ती बिबडेवाडी परिसरात राहते. तिनेच विद्यार्थ्यांना पेपर लिक करणाऱ्यांपर्यंत पोहचवल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. दरम्यान संध्याकाळपर्यंत मनीषाला सीबीआयच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे समजते.

पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी अहिल्या नगर येथून धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीदरम्यान पोलिसांना मनीषा बाबत समजले. मनीषा ही विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहचवायची असे समजते. पोलिसांनी तिच्याकडून एक लॅपटॉप व मोबाईल जप्त केला आहे. धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागले असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. ABP MAJHA ने याबाबत वृत्त दिले आहे.

शुभम खैरनारला दिल्लीला नेणार

पेपरफुटीप्रकरी अटक करण्यात आलेल्या शुभम खैरनार याला सीबीआयने आज मुंबई किल्ल कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर. कोर्टाने त्याला पुढील तपासासाठी दिल्लीला नेण्याची परवानगी देखील सीबीआयला दिली आहे. तिथे त्याला सीबीआयच्या कोर्टात हजर केले जाणार आहे.

Comments are closed.