NEET पेपरफुटीप्रकरणी शुभम खैरनार, मग धनंजय लोखंडेला अटक; आता पुण्यातील महिलेलाही घेतलं ताब्यात
नाशिक NEET पेपर लीक: देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची व्याप्तीती वाढत असल्याचे चित्र आहे. अशातचनीट परीक्षा पेपर फुटीनंतर (NEET Paper Leak Crime Case) राज्यात देखील कारवाई सुरू झाली असून, नाशिकच्या शुभम खैरनार याच्यानंतर दुसरा संशयित आरोपी धनंजय लोखंडे यास विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यातील रहिवासी असलेला व सध्या पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे वास्तव्यास असणारा धनंजय लोखंडे याला विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. धनंजयला राहुरीतून ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्थानिक वरिष्ठ पोलिसांना मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यानकालावधी (१२ मध्ये) CBI पथकाने राहुरी तालुक्यातील महाडिक सेंटर या मूळगावी चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यानंतर मध्यरात्री कारवाई केल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत कुटुंबीय सध्या कॅमेरा समोर बोलण्यास तयार नाही. मात्र धनंजय यांच्या वडिलांनी मुलाला राहुरीतून ताब्यात घेतले नसल्याचं सांगितले आहे.
Nashik Crime : नाशिकच्या शुभम खैरनारची कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर
दुसरीकडे या निट प्रकरणातील नाशिक मधील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. आरोपी शुभम खैरनारच्या भावाकडून काही दिवसांपूर्वीच पोलीसांनी गावठी पिस्टल जप्त केले होते. शुभमचा भाऊ भावेश खैरनारला नांदगाव पोलीसांनी या प्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या. भावेशने दहशत माजवण्यासाठी पिस्टल खरेदी केली होती, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर याघेतला होती. भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानूसार भावेश आणि त्याच्या साथीदाराविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर भावेश खैरनार सध्या जामिनावर मुक्त असल्याची माहिती आहे.
Pune Crime News : विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदतपुणे पोलिसांनी महिलेला केली अटक
NEET पेपरप्रकरणात पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. यात विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचवण्याएस हि स्त्री मदत करत आल्याचा संशय पोलिसांना आहे. NEET पेपरप्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेचा ताबा घेतला आहे. संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याला हि स्त्री मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम मनीषा वाघमारे करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
Pune Crime : मोबाईल, लॅपलॉप उघडताच हादरवणारी माहिती
या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, मनीषा वाघमारे हिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
कोण आहे धनंजय लोखंडे ? (Who is Dhananjay Lokhande?)
धनंजय निवृत्ती लोखंडे
वय – 26
राहुरी तालुक्यातील माहेगाव – महाडूक सेंटर मूळ गाव..
वडील शैक्षणिक संस्थेत क्लार्क
दोन भाऊ , मोठा भाऊ देखील डॉक्टर..
शिक्षण – B.A.MS.. कर्नाटक राज्यातील मंगळूरु विद्यापीठ..
दोन वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण
मेडिकल ऍडमिशनसाठी पुण्यात कन्सल्टिंग करत असल्याची प्राथमिक माहिती..
वाघोली, पुणे येथे वास्तव्यास होता आणि तिथेच प्रॅक्टिस करत असल्याची माहिती..
गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास.
गावाकडे क्वचित यायचा..
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.