पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं का

पुणे : पुण्यात सुनेन सासूवर धारदार चाकूने वार करून संपवल्याची घटना घडली आहे. घरगुती वादातून (Pune Crime News) ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. कात्रज आंबेगाव बुद्रुकमधील ही धक्कादायक घटना आहे. मृत सासूचे नाव सुमन शिंदे वय वर्षे ८० तर आरोपी सुनेचे नाव अनुपमा शिंदे वय वर्षे ६० आहे, पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपी सुनेला ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ (Pune Crime News) पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. 12 तारखेला दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. घरगुती वादावरून चाकूने हातावर गळ्यावर वार करून सुनेने सासूचा खून केल्याची पोलिसांची माहिती. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन करत आहेत.(Pune Crime News)

Pune Crime News: कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

बेगाव बुद्रुक परिसरातील ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुनेने सासूचा चाकूने गळ्यावर वार करून निर्घृणपणे संपवल्याची घटना काल (मंगळवारी, ता १२) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सुमन शिंदे (वय ८०) असे असून आरोपी  सुनेचे नाव अनुपमा संजय शिंदे (वय ६०) आहे. दोघीही आंबेगाव बुद्रुक येथील समृद्धी रेसिडेन्सीमध्ये राहत होत्या. मंगळवारी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणांवरून सासू-सुनेमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपी अनुपमा शिंदे यांनी घरातील आपल्या सुनेला बेडरूममध्ये ढकलून बाहेरून कडी लावली. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकघरातील चाकू घेत वृद्ध सासू सुमन शिंदे यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात सुमन शिंदे यांच्या गळ्यावर आणि हातावर सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या सुमन शिंदे रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अनुपमा शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.