सुवर्णनगरीचा ‘ट्रेंड’ बदलला! लग्नसराईतही ग्राहकांकडून नव्या सोन्याच्या खरेदीला ब्रेक, जुने मोडू

गोल्ड मार्केट ट्रेंड: देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि परकीय चलनाची बचत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांनी देशवासीयांना ‘एक वर्ष सोने खरेदी करू नका’ असे आवाहन केले होते. या आवाहनाचा मोठा परिणाम उत्तर महाराष्ट्राची सुवर्णनगरी मानल्या जाणाऱ्या जळगावच्या (Jalgaon) सराफ बाजारात दिसून येत आहे. जळगावच्या ग्राहकांनी आपला खरेदीचा कल (Trend) पूर्णपणे बदलला असून, नव्याने सोने (Gold) खरेदी करण्याऐवजी जुने दागिने मोडून नवीन दागिने घेण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे.

Gold Market Trend: नव्या सोने खरेदीत मोठी घट

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जळगावच्या बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. मात्र, सध्या लग्नसराईचा काळ असल्याने अनेकांना दागिन्यांची गरज आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांनी मधला मार्ग शोधला आहे. नवीन बिस्किटे किंवा नाणी विकत घेऊन दागिने घडवण्याऐवजी, घरातील जुने सोने देऊन त्याबदल्यात नवीन डिझाईनचे दागिने घेण्याला नागरिक पसंती देत आहेत. यामुळे बाजारात सोन्याची उलाढाल ‘एक्सचेंज’ स्वरूपात अधिक होताना दिसत आहे.

Gold Market Trend: तज्ञांचे मत

या बदलत्या परिस्थितीबाबत बोलताना रत्नलाल बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी करू नये असे जे आवाहन केले आहे, त्याचा जळगावकरांनी सन्मान केला आहे. बाजारात नव्याने सोने खरेदी करण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. ग्राहक आता जुने दागिने घेऊन येत असून, तेच मोडून नवीन दागिने तयार करून घेत आहेत.”

Gold Market Trend: ग्राहकांच्या प्रतिक्रिया

लग्नसराईसाठी सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी सांगितले की, “पंतप्रधानांच्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. पण घरात विवाह सोहळा असल्याने दागिने खरेदी करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे देशाच्या इंधन आणि चलनाच्या बचतीला हातभार लावण्यासाठी आम्ही नव्याने सोने खरेदी न करता, घरातीलच जुने सोने मोडून नवीन दागिने घेण्याचा निर्णय घेतला आहे.” पंतप्रधानांच्या एका आवाहनामुळे जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेने बदललेली ही दिशा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे.

Gold Silver Price Today: जळगावात सोने-चांदीचे दर स्थिर

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जीएसटी वगळता सोन्याचा दर प्रति किलो 1 लाख 59 हजार रुपये असून, चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 85 हजार रुपये इतका कायम आहे. कालचेच दर आजही कायम असल्याने बाजारात स्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा

Gold Silver Price Today : जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार; चांदीचा भाव 2600 रुपयांनी घसरला; जाणून घ्या आजचे दर

आणखी वाचा

Comments are closed.