Adhik Mass : धोंड्याचा महिना आणि जावयाचा मानपान; काय आहे यामागील कारण?

दर तीन वर्षांनी अधिक मासाचा महिना येतो. ज्याला ‘पुरुषोत्तम’ मास किंवा ‘मल मास’ असे देखील म्हणतात. यंदा 17 मे पासून अधिक मासाला सुरूवात होत आहे. या काळात शुभ कार्ये किंवा समारंभ करण्यात मनाई असते. परंतू, या महिन्यात जावयाचा विशेष मान सन्मान केला जातो. जावयाला घरी जेवायला बोलावून त्यांना वाण दिले जाते, त्याचे आदरातिथ्य केलं जातं. पण याच महिन्यात जावयाचा मान-सन्मान का? काय आहे यामागचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊयात सविस्तरपणे,

जावयाचा सन्मान का?

अधिकमास हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आपला जावई हा साक्षात विष्णू आणि आपली लेक म्हणजे लक्ष्मी देवीचे स्वरून मानून या महिन्यात त्यांना घरी जेवण्यास आमंत्रण दिले जाते. जेवायला बोलावून त्यांना मेजवानी दिले जाते, जावयाचा सन्मान केला जाते. आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून जावयाला विष्णूचे रूप मानून त्याचे पूजन केलं जाते. याशिवाय या महिन्यात दानाला विशेष महत्त्व असते. कन्यादान केल्यानंतर जावई हा कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होतो. जावयाला दिलेले दान हे प्रत्यक्ष विष्णूला अर्पण केल्यासारखे मानले जाते. त्यामुळे अधिक मासात जावयाचा मान करण्याची प्रथा आहे.

हेही वाचा – Religious- हिंदू धर्मातील १६ संस्कार

वाणात काय द्यावे?

जावयाला वाण देताना त्याला पाटावर बसण्यास सांगावे. यानंतर कुंकू लावून ओवाळावे. वाण देण्यासाठी चांदीचे ताट किंवा निरंजन देण्याची पद्धत आहे. मात्र आजचे सोने चांदीचे भाव बघता तुम्ही ऐपतीप्रमाणे त्यांचा मान-सन्मान करू शकता. लेकीचीही साडीचोळीने ओटी भरावी. आपल्या मुलीला सासरच्या वातारणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई हा मुलीच्या आईवडिलांसाठी नारायणासमान असतो. त्यामुळे या मासात जावयाचा मान करण्याची प्रथा आहे. ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आली असून आजही जपली जाते.

हेही वाचा – Adhik Maas: 2026 मध्ये अधिक मास केव्हा सुरू होणार?

Comments are closed.