Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!
पंतप्रधान मोदींनी केलेलं आवाहन गांभीर्याने घेणं गरजेचं असून त्यावर नेत्यांनी दिखावा करू नये. ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, त्यामध्ये सातत्य दाखवावं असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडलं. देशात सध्या गंभीर स्थिती असून पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणीही शरद पवारांनी केली. तसेच निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंधन बचतीचा विचार का आला नाही? इंधन बचतीचा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला? असे प्रश्न शरद पवारांनी विचारले.शरद पवार म्हणाले की, “पंतप्रधांनांनी जे काही आवाहन केलं आहे त्यावरून परिस्थिती गंभीर आहे असं दिसतंय. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाची सर्वांनी नोंद घ्यावी. या पूर्वीही देश अशा परिस्थितीला सामोरं गेला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर प्रशासनाच्या खर्चात बचत करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यावर काम करावं.”पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर कुणी गाड्यांचा ताफा कमी करतोय तर कुणी पायी चालतोय असं दिसतंय. पण ताफा सोडणाऱ्या मंत्र्यांनी दिखावा करू नये, त्यामध्ये सातत्य दाखवावं असा सल्लाही यावेळी शरद पवारांनी दिला. एक किंवा दोन दिवसांच्या बचतीने काही होणार नाही. आता मोदींचं आवाहन त्यांचे नेते किती दिवस पाळतात हे पाहावं लागेल, असंही शरद पवार म्हणाले.
Comments are closed.