Mouni Roy Suraj Nambiar – आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय! लग्नाच्या 4 वर्षांनंतर अभिनेत्रीचा काडीमोड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय हिने पती सुरज नंबियार याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर मौनीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे या चर्चांना दुजोरा दिला आहे.

मौनीने शेअर केलेल्या निवेदनात माध्यमांकडून त्यांच्या खासगी आयुष्यात होत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेक अफवा आणि खोट्या गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात असून त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत आहे, असे मौनी म्हणाली.

बदलत्या वैयक्तिक प्राधान्यांचा विचार करून तिने आणि सूरजने परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आदर, समजूतदारपणा आणि शांततेने घेतल्याचेही तिने नमूद केले आहे. तसेच, पुढील काळात मैत्रीपूर्ण नातं कायम ठेवण्याचा प्रयत्न करू असेही दोघांनी सांगितले आहे. चाहत्यांनी आणि माध्यमांनी त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मौनी पोस्टखालील कमेंटही तिने बंद केलेल्या आहेत.

मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांनी 27 जानेवारी 2022 रोजी गोवा येथे पारंपरिक बंगाली आणि मल्याळी पद्धतीने लग्न केले होते. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments are closed.