रिलायन्स फाऊंडेशन स्कूलच्या मीत अंकित छेडाचे सीबीएसई बारावी परीक्षेत दैदिप्यमान यश
कोपरखैरणे येथील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलच्या मीत अंकित छेडा याला सीबीएसई (CBSE) बारावी परीक्षा 2025-26 च्या बोर्ड परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले. मीतला 500 पैकी 495 गुण मिळाले आहेत. कॉम्प्युटर सायन्समध्ये 100 पैकी 100 गुण, इंग्रजीत 99 गुण, गणितात 99 गुण, भौतिकशास्त्रात 99 गुण आणि रसायनशास्त्रात 99 गुण मिळाले. सातत्य, शिस्तबद्ध अभ्यास आणि रिलायन्स फाऊंडेशन स्कूलच्या दर्जेदार शैक्षणिक वातावरणाचे हे यश आहे.
कोणत्याही ठराविक धोरणापेक्षा इतरांच्या खंबीर पाठिंब्यामुळे माझा हा प्रवास यशस्वी झाला. मी प्रत्येक टप्प्यावर माझे सर्वोत्तम देण्यावर लक्ष केंद्र केले. पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करून आणि पहाटेच्या वेळेचा पुरेपूर उपयोग करून माझी अभ्यासाची क्षमता वाढवली. तसेच कोणत्याही खाजगी ट्युशनवर अवलंबून न राहता शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. मी वर्गातील चाचणी परीक्षा आणि गृहपाठ प्रामाणिकपणे केला, ज्यामुळे नंतर दडपण न येता सतत सुधारणा होत राहिली. शाळेतील चाचणी परीक्षा आणि गृहपाठ मी प्रामाणिकपणे पूर्ण केले, ज्यामुळे परीक्षेचा ताण आला नाही. स्वतःवरील विश्वासामुळेच मी आव्हानांवर मात करू शकलो, अशी भावना मीतने शेवटी व्यक्त केली.
Comments are closed.