Beed news – प्रवाशांच्या सुरक्षेचा बोजवारा! बीड बसस्थानकात 15 लाखांचे दागिने चोरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बीड येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास बसमध्ये चढत असताना एका महिलेचे अंदाजे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. संबंधित महिला केज येथून बीड बसस्थानकात आली होती आणि पुढील प्रवासासाठी दुसऱ्या बसमध्ये चढत होती. बसमध्ये बसल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने तत्काळ खाली उतरून पोलीस चौकी गाठत आक्रोश केला.

घटनेनंतर पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. मात्र, बसस्थानकात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांकडून बसस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

“सोने नेमके कुठे चोरीला गेले हे संबंधित महिलेला आठवत नाही. ती महिला केजहून बीड बसस्थानकात आली होती आणि पुढील प्रवासाला निघाली होती. महिलेची तक्रार तपासून नोंदवली जाईल”, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी शांताराम डांबाळ यांनी सांगितले.

Comments are closed.