अमेरिका गौतम अदानींवरील आरोप मागे घेण्याच्या तयारीत? अमेरिकन माध्यमांमधून मोठा दावा

गौतम अदानी प्रकरण: उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावरील अमेरिकेतील कथित लाचखोरी आणि गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात मोठं वळण येण्याची शक्यता आहे. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, तिथले सरकार गौतम अदानी यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याच्या तयारीत आहे. हा दावा खरा ठरल्यास तो अदानी समूहासाठी मोठा दिलासा मानला जाईल.

ज्यो बायडेन (Joe Biden) यांच्या प्रशासनाच्या अखेरच्या काळात United States Department of Justice ने अदानी समूहावर अमेरिकन गुंतवणूकदारांच्या पैशांशी संबंधित कथित भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते.

US Media Report : वकिलांनी 100 स्लाइड्सद्वारे मांडली भूमिका

अमेरिकन वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, अदानी यांच्या वकिलांनी गेल्या महिन्यात वॉशिंग्टन डीसी येथील न्याय विभागाच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सुमारे 100 स्लाइड्सच्या सादरीकरणातून प्रकरणातील मूलभूत पुराव्यांचा अभाव आणि अमेरिकन न्याय विभागाला या प्रकरणावर अधिकारक्षेत्र नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

Adani Group Legal Strategy : अधिकारक्षेत्र आणि पुराव्यांवर प्रश्नचिन्ह

अदानींच्या लीगल टीमने या प्रकरणातील पुरावे अपुरे असल्याचा दावा केला. तसेच हा खटला दाखल करण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांकडे आवश्यक कायदेशीर अधिकार नसल्याचंही त्यांनी मांडल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

Adani Group Investment Proposal : 10 अब्ज डॉलर गुंतवणुकीची तयारी?

अमेरिकन माध्यमांच्या दाव्यानुसार, आरोप मागे घेतल्यास अदानी समूहाकडून अमेरिकन अर्थव्यवस्थेत 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास आणि सुमारे 15,000 रोजगार निर्माण करण्यास तयार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र सरकारी वकिलांनी ही संभाव्य गुंतवणूक खटल्याच्या निकालावर कोणताही परिणाम करणार नसल्याचं स्पष्ट केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

Adani Group Relief : अधिकृत पुष्टी अद्याप नाही

या दाव्यांबाबत अमेरिकन न्याय विभाग किंवा अदानी समूहाकडून अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अमेरिकन माध्यमांतील या वृत्ताकडे प्राथमिक माहितीसारखे पाहिले जात आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.