किती खाणार? जाडी होशील… वजन जास्त असल्याने भारती सिंगला ऐकावे लागायचे खूप टोमणे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लाफ्टर क्वीन भारती सिंह ‘द कपिल शर्मा शो’मध्ये विविध भूमिकांमध्ये दिसते. रिपोर्टनुसार, भारती देखील एका एपिसोडसाठी 10 ते 12 लाख रुपये घेते.

कॉमेडियन भारती सिंग तिच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखली जाते. तिचे विनोद लोकांना खळखळून हसवतात. तिचे चाहते तिची स्टाइल, बोलण्याची शैली आणि हलक्याफुलक्या विनोदासाठी तिच्यावर प्रेम करतात. अलीकडेच तिने नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या ‘डबल डेट’ या शोमध्ये बॉडी शेमिंगबद्दलचे तिचे अनुभव सांगितले. तिने स्पष्ट केले की, ती ज्या वातावरणात वाढली, तिथे बॉडी शेमिंग ही एक सामान्य गोष्ट होती. भारती सिंग ही कायमच तिच्या हजरजबाबी वक्तव्यासाठी प्रसिद्ध राहिली आहे. याच जोरावर तिने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे असे स्थान मिळवले.

पंजाबमधून मुंबईत आल्यानंतर तिने एक प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. नेहा धुपियासोबतच्या संभाषणात भारती सिंगने स्पष्ट केले की, ती ज्या वातावरणात वाढली, तिथे बॉडी शेमिंगला सामान्य मानले जात होते. तिच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आणि स्पष्ट केले की तिच्या गावी लोकांना त्यांच्यातील उणिवांवरून हिणवले जायचे. ती म्हणाली, “जर कोणी जास्त वजनाचे असेल तर त्याला ‘जाड’ म्हणायचे आणि जर कोणी सावळा असेल तर त्याला ‘काळा’ म्हणायचे, अशा शब्दांचा समोरच्या व्यक्तीच्या भावनांवर काय परिणाम होईल याची पर्वा न करता.”

भारती सिंगने पुढे सांगितले की तिची आई तिला अनेकदा गंमतीने म्हणायची, “बस कर, किती खाणार, जाड होशील.” तिने स्पष्ट केले की, अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाला आणि आत्मसन्मानाला किती खोलवर धक्का पोहोचवू शकतात , हे तिला बराच काळ जाणवले नव्हते.

ती म्हणाली, “जेव्हा मी मनोरंजन क्षेत्रात आले आणि माझ्या विनोदी टायमिंगमुळे ओळखली जाऊ लागले, तेव्हा माझ्या लक्षात आले की लोक अनेकदा इतरांच्या शरीराची किंवा दिसण्याची चेष्टा करतात. मात्र, काळानुसार आणि समजुतीने, मी इतरांची चेष्टा करण्यासाठी असे शब्द न वापरण्याचे ठरवले.” भारती म्हणाली या जाणिवेने तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.

Comments are closed.