Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवून संपूर्ण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसला (दहशतवाद विरोधी पथक) मोठे यश आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर दबा धरून बसलेल्या एटीएसच्या पथकाने या आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी राठोड असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी हा आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करत होता. ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आली असता, तो गाडीतून उतरत असतानाच आधीच सज्ज असलेल्या एटीएसच्या पथकाने त्याला चहुबाजूंनी घेरून ताब्यात घेतले. सध्या या आरोपीला नागपूर एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सर्व माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत माहिती सांगताना अमितेश कुमार म्हणाले, पोलीस तपासाच्या आधारावर आरोपी रेल्वेने नागपूरच्या दिशेने पळालेला आहे असं समोर आलं होतं, अकोला पोलिसांशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर येथे त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो सापडला नाही, त्यानंतर नागपुरातील रेल्वे स्टेशनवर त्याला एटीएस पथकाने त्याला ताब्यात घेतलेले आहेत, आरोपीला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, आज रात्रीपर्यंत पोलीस त्याला घेऊन पुण्यात पोहचतील, यामध्ये कोणताही दहशतवादी अँगल आलेला नाही, ती सर्व घटना त्याने एकट्यानेच केली होती, तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे. तपासातील पुढचे अपडेट आपल्याला वेळोवेळी देण्यात येतील, प्रथमदर्शनी तपासामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यानंतर सर्व माहिती येईल, या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्याच्या ठिकाणांवर झडती प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपी एकटाच होता अशी माहिती समोर आली आहे, दहा तारखेला तो त्याच्या पर्सनल ट्रीटमेंट साठी तर हॉस्पिटलमध्ये गेला होता, असे प्रथमदर्शनी समोर आले आहे, तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व माहिती समोर येईल.

Comments are closed.