IPL 2026 – तळाच्या LSG ने CSK चे गणित बिघडवले, प्ले ऑफ गाठण्यासाठी पुढील दोन्ही सामन्यात विजय आवश्यक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गुणतालिकेत तळाशी असलेल्या लखनौ सुपर जायंटस संघाने चेन्नई सुपर किंग्जचे प्ले ऑफ गाठण्याचे गणित बिघडवले आहे. लखनौच्या एकाना मैदानावर झालेल्या लढतीत LSG ने CSK ला 7 विकेटने धूळ चारली. निकोलस पूरन याने कंबोज याच्या गोलंदाजीवर एकामागोमाग एक 4 षटकार खेचत LSG ला विजयी केले.

CSK ने विजयासाठी दिलेले 188 धावांचे आव्हान LSG ने 20 चेंडू बाकी असताना 3 विकेट्स गमावत पूर्ण केले. या पराभवामुळे 12 गुणांसह सहाव्या स्थानावर असलेल्या चेन्नईला धक्का बसला असून प्ले ऑफ गाठण्यासाठी आता पुढील दोन्ही लढतीत विजय आवश्यक आहे.

Comments are closed.