प्लेऑफआधी सीएसकेमध्ये कुलदीप यादवची एंट्री; आरसीबीने 38 वर्षीय गोलंदाजाला साइन करत टाकला मोठा डाव!

आयपीएल २०२६ स्पर्धा आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, प्लेऑफमधील स्थानासाठीच्या शर्यतीत तीव्र चुरस पाहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या मागील सामन्यात या हंगामातील आपला आठवा विजय नोंदवत, प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. बंगळुरूचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज सहा विजयांसह पाचव्या स्थानावर कायम आहे. आपल्या आगामी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही संघांनी आपल्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी पर्यायी खेळाडूंची घोषणा केली आहे.

चेन्नई सुपर किंग्जने वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या जागी, देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या कुलदीप यादवचा संघात समावेश केला आहे. दरम्यान, बंगळुरूच्या संघाने श्रीलंकेचा गोलंदाज नुवान तुषाराच्या जागी, अनुभवी इंग्लिश वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला करारबद्ध केले आहे.

दुखापतींमुळे खलील अहमद आणि नुवान तुषारा हे दोन्ही खेळाडू या हंगामातील उर्वरित सामन्यांतून बाहेर झाले आहेत. चेन्नईने कुलदीप यादवला ३० लाख रुपयांना संघात घेतले आहे. कुलदीपने २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते; आतापर्यंत त्याने या लीगमध्ये केवळ तीन सामने खेळले आहेत.

दुसरीकडे, बंगळुरूने रिचर्ड ग्लीसनला १.६ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. ३८ वर्षीय ग्लीसनने इंग्लंडकडून खेळलेल्या ६ टी-२० सामन्यांमध्ये ९ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, ग्लीसन यापूर्वी आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या आणि २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता.

चेन्नईसाठी कुलदीप यादव हा गोलंदाजीचा एक अतिरिक्त पर्याय ठरू शकतो, तर रिचर्ड ग्लीसन ज्याला मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तो बंगळुरूच्या गोलंदाजी आक्रमणाला अधिक बळ देण्याची शक्यता आहे.

Comments are closed.