रॉयल सोसायटीतर्फे सौम्या स्वामीनाथन यांचा सन्मान डॉ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य वैज्ञानिक आणि आयसीएमआरच्या माजी महासंचालिका डॉ. सौम्या स्वामिनाथन यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडण्यात आले आहे. हा विज्ञानाच्या क्षेत्रात जगातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर सन्मानित डॉ. स्वामिनाथन यांनी क्षयरोग, एचआयव्ही आणि कोविड महामारी यासारख्या मोठ्या आरोग्य संकटांना हाताळण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

डॉ. स्वामिनाथन यांनी दशकांपासून विज्ञान, आरोग्य सेवा धोरण आणि जागतिक संकटांना तोंड देण्याच्या प्रयत्नांना एकत्र आणण्यावर काम केले आहे. यामुळे त्यांना सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सर्वात विश्वसनीय आवाजांपैकी एक अशी ओळख मिळाली आहे. द रॉयल सोसायटी ऑफ लंडन फॉर इम्प्रूविंग नॅचरल नॉलेजला सर्वसाधारणपणे ‘रॉयल सोसायटी’ नावाने ओळखले जाते, ही ब्रिटनची राष्ट्रीय विज्ञान अकादमी आहे. या सोसायटीचा उद्देश विज्ञानाला चालना देणे, विज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेला मान्यता देणे, प्रभावी वैज्ञानिक कार्याना समर्थन देणे, धोरण-निर्मिती, शिक्षण आणि जनसहभागासाठी वैज्ञानिक सल्ला पुरविणे, आंतरराष्ट्रीय आणि जागतिक सहकार्याला बळ देणे आहे.

Comments are closed.