नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक; मोटेगावकरकडून स्वत:च्या मुलासाठी खरेदी क

मनोज शिरुरे NEET परीक्षा 2026 पेपर लीक: देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Exam 2026 Paper Leak) पुण्यातून आणखी एका आरोपीला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला हा आरोपी बालरोगतज्ज्ञ असून डॉक्टर मनोज शिरुरे (Manoj Shirure) असं त्याच नाव आहे.

मनोज शिरुरे याने शिवराज मोटेगावकरकडून (Shivraj Motegaonkar) स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने मनोज शिरुरेला लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणलं होतं. या चौकशीनंतर मनोज शिरुला सीबीआयने अटक केली. हा डॉक्टर मनोज शिरुरे मूळचा लातूरचा आहे. आतापर्यंतच्या कारवाईतील ही पहिली अटक आहे, जी एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली आहे. आतापर्यंत ज्यांनी नीटचा पेपर फोडला, नीटचा पेपर विकला…यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु आता नीटचा पेपर स्वत:च्या मुलासाठी खरेदी करणाऱ्या पहिल्या पालकाला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरण आणखी गडद होत आहे. (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)

कोण आहे बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे? (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)

लातूर शहरात NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची कारवाई आणखी वेगाने सुरू असून, RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या नेटवर्कमधील संशयितांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या CBI पथकाने काल संध्याकाळी जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथे पोहोचले. हे रुग्णालय बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांचे आहे. फुटलेला NEET पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून त्यांची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान काही कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल पुरावे CBI ने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. CBI च्या प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे हे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून ते पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

नीटच्या पेपरफुटीची मोडस ऑपरेंडी, काय काय घडलं? (NEET Exam 2026 Paper Leak)

नीटच्या पेपर फुटीचा कट शिवराज मोटेगावकरने (Shivraj Motegaonkar) त्याच्या साथीदारांना हाताशी धरुन अतिशय सुनियोजितपणे आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. त्यासाठी मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासमधे काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणार्या पॅनलवर वर्णी लावून घेतली. सोबत मनीषा मांढरे (Manisha Mandhare) हीची देखील NTA च्या पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि त्या मोटेगावकरपर्यंत पोहोच करणार अशी सोय करण्यात आली. वर्षानुवर्षे अध्यापनाचे काम केल्याने पीव्ही कुलकर्णीने केमिस्ट्रीच्या तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले. NTA मध्ये प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी त्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न तोंडपाठ केले. त्यानंतर ते हाताने लिहून काढून मोटेगावकरला पाठवले. मोटेगावकरने ते पीडीएफच्या स्वरुपात स्वत:च्या मोबाईलमधे सेव्ह करुन ठेवले आणि पुढे पैशांच्या बदल्यात त्यांची विक्री केली. 3 मे रोजी परिक्षा पार पडल्यावर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआयने मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला आणि मोटेगावकरला अटक झाली.

संबंधित बातमी:

Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना…; CBI थेट मॉडर्न कॉलेजमध्ये घुसली, मनीषा मांढरेच्या कपाट-लॉकरमध्ये काय मिळालं?

आणखी वाचा

Comments are closed.