मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी मारू -प्रमोद जठार
इंधनटंचाईमुळे देशावर आलेल्या संकटकाळात भारतीय जनता पक्षाचे नेते वेगवेगळी वक्तव्ये करू लागले आहेत. भाजप आमदार प्रमोद जठार यांनी तर आज कहरच केला. मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी मारू, असे म्हणत त्यांनी आपणही एक अंधभक्तच आहोत असा जाहीर परिचय दिला.
प्रमोद जठार यांना अलीकडेच भाजपने विधान परिषदेची आमदारकी दिली. एका जाहीर कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली. देशच नव्हे, तर सारे जग एका संकटातून चालले आहे. पण देशाला मोदींसारखे नेतृत्व आहे. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवूनच टाकले आहे. मोदी म्हणाले देशरक्षणासाठी समुद्रात उडी मारा तरी आम्ही सर्व मिळून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणत समुद्रात उडी मारणार, असे जठार म्हणाले.
Comments are closed.