IPL 2026 – चेन्नई विजयानंतरही जाऊ शकते प्ले ऑफ बाहेर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नईचा अखेरचा साखळी सामना गुंरुवारी होणार आहे. चेन्नईने हा सामना जिंकला तर त्यांचे 14 गुण होतील. पण तरीही त्यांना अन्य संघांच्या पराभवाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे अखेरचा सामना जिंकल्यावरही त्यांना प्ले ऑफमध्ये सहजासहजी स्थान मिळणार नाही.

राजस्थानच्या विजयाने लागणार स्पष्ट निकाल

आरसीबी, गुजरात आणि हैदराबाद हे तीन संघ तर प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. आता चौथ्या संघासाठी चार जणांत स्पर्धा आहे. चेन्नईचे विजयानंतर चार गुण होतील. राजस्थानचा एक सामना बाकी आहे आणि त्यांचे 14 गुण झालेले आहेत. जर राजस्थानने विजय साकारला तर त्यांचे 16 गुण होतील आणि ते थ्ंाsट प्ले ऑफमध्ये जातील. त्यानंतर अन्य सहा संघांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

पंजाबच्या विजयानंतर काय होणार

पंजाबचाही अजून एक सामना बाकी आहे. पंजाबच्या खात्यात आता 13 गुण आहेत. त्यामुळे जर पंजाबने विजय साकारला तर चेन्नईचे आव्हान संपुष्टात येईल. पण पंजाबलाही राजस्थान आणि केकेआर विजय मिळवतात की नाही, यावर अवलंबून राहावे लागेल.

केकेआरने विजय साकारला तरीही चेन्नई बाहेर

केकेआरच्या संघाच्या अजूनही दोन लढती बाकी आहेत. केकेआरच्या खात्यात आता 11 गुण आहेत, त्यामुळे जर त्यांना प्ले ऑफच्या दिशेने पूच करायचे असेल तर त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. एकही सामना त्यांनी गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. पण जर केकेआरने दोन्ही सामन्यांत विजय मिळवले तर चेन्नईचे आव्हान संपुष्टात येणार आहे.

Comments are closed.