बंगालमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर क्रूड बॉम्ब सापडला आहे.
कोलकाता: पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भाजप नेत्याच्या घराबाहेर देशी बॉम्ब आणि धमकीचे पत्र मिळाल्याने दहशत निर्माण झाली. ही घटना बशीरहाट येथील शशिना गावात घडली आहे. भाजप नेते अनिल बरक मल्लिक यांना धमकी मिळाली असून त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी घटनास्थळी पोहोचत विस्फोटकांना ताब्यात घेतले आहे. या धमकीमागे राजकीय कट असू शकतो, असा दावा मल्लिक यांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेत तपास केला जात आहे. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. बॉम्ब कुठून आले आणि रात्री घराबाहेर कोण आले याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Comments are closed.