पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणे महिला पत्रकाराला पडले महागात; फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाते बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानातील प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचारांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वेतील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे महिला पत्रकार हेले लिंग यांना महाग पडले. त्यांचे फेसबुक, इन्स्टाग्राम खाते ‘मेटा’ या मूळ कंपनीने बंद केले.

मोदी यांना प्रश्न विचारणाऱ्या हेले लिंग यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी त्यानंतर अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या, मात्र बुधवारी त्यांचे खाते बंद करण्यात आले. हेले लिंग यांनी यासंदर्भात ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यात त्यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुक खाते बंद करण्यात आल्यासंदर्भात म्हटले की, प्रेस फ्रीडमसाठी मोजावी लागणारी ही छोटीशी किंमत आहे, मात्र मी आधी असा अनुभव घेतला नव्हता. अखेर काही तासांनी लिंग यांचे खाते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले.

Comments are closed.