केवळ 3 आमदार असतानाही विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार डॉ.
केरळमध्ये भाजपची गोपाकुमारांना उमेदवारी
वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
केरळ विधानसभेत पहिल्यांदाच 3 जागा जिंकून इतिहास रचणारा भाजप आता विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्वत:चा सहभाग नोंदविणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली आहे. कोल्लम जिल्ह्यातील चथन्नूर मतदारसंघाचे आमदार बीबी गोपाकुमार यांना पक्षाने विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. गोपाकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मी स्वत: आणि भाजप आमदार व्ही. मुरलीधरन मिळून मांडणार आहोत, असे चंद्रशेखर यांनी सांगितले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने यापूर्वीच थिरूवनचूर राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर एलडीएफने उमेदवाराची घोषणा केलेली नाही.
सभागृहात भाजपचे संख्याबळ
केरळ विधानसभेत भाजपचे 3 आमदार आहेत, यात बीबी गोपाकुमार, व्ही. मुरलीधरन आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. पक्षाने अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीत तीन जागा जिंकून राज्याच्या राजकारणात स्वत:चे अस्तित्व मजबूत केले आहे.
Comments are closed.