भाजपमध्ये ये नाहीतर अमेरिकेतच मारून टाकू, कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी
सध्या देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दीपके यांना व्हॉट्सअॅवर धमकीचा मेसेज आला आहे.
आता जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. pic.twitter.com/agCy94jXEf
— अभिजीत दिपके (@abhijeet_dipke) 22 मे 2026
दीपके यांना आलेल्या मेसेजमधून त्यांना भाजपमध्ये प्रवेश कर असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्यासाठी पैसे देखील दिले जातील असे सांगण्यात आले आहे.
”भाजपमध्ये ये किंवा तुझे सर्व अकाऊंट बंद कर. त्यासाठी तुला पैसे दिले जातील नाहीतर अमेरिकेतच मारून टाकू तुला”, अशी धमकी दीपके यांना देण्यात आली आहे.दीपके यांनी स्वत: या धमकीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत त्याबद्दल माहिती दिली आहे.
Comments are closed.