लाईफ गार्ड 4 किलोमीटर समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा देणार! पालिका प्रशासनाची माहिती, स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या सहा चौपाटय़ांवर एकूण 93 लाईफ गार्ड दोन शिफ्टमध्ये तैनात करण्यात येणार असून हे लाईफ गार्ड प्रत्येक चौपाटीचा किमान तीन ते चार किलोमीटरचा परिसर कव्हर करून सुरक्षा देतील, अशी माहिती आज स्थायी समितीत अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली. स्थायी समितीत आज सुरक्षा गार्ड पुरवणाऱ्या कंपनीच्या कंत्राटाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

अतिउत्साही आणि बेजबाबदार पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो. समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याच्या दिवशी पालिकेकडून धोक्याचा इशारा दिला जातो. यानुसार मुंबईकर-पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जून 2005 पासून लाईफ गार्ड तैनात करण्याच्या कंत्राटाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेवक यशोधर फणसे यांनी लाईफ गार्ड गप्पा मारत बसलेले असतात?, बोट कोण पुरवणार?, लाईफ गार्डनी आतापर्यंत किती लोकांचा जीव वाचवला, असे प्रश्न उपस्थित केले.

Comments are closed.