15 ऑगस्टनंतर मराठी शिकण्यासाठी मिनिटाचीही मुदतवाढ देणार नाही, सरकारचा स्पष्ट इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, थेट कारवाई सुरू होईल, असा स्पष्ट इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिला.

रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात यासंदर्भात आढावा घेण्यात आला. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास पेंद्रे उभारण्यात येणार आहेत. रिक्षा-टॅक्सी चालकांनी ऑनलाईन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष पेंद्रांमध्ये जाऊन मराठी भाषा शिकून घ्यावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले. परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनी प्रशिक्षण पेंद्रांची अंतिम यादी निश्चित करून ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही सरनाईक यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रवी गायकवाड, संदेश चव्हाण, डॉ. ना. काsं. भोसले, डॉ. श्यामकांत देवरे, प्रा. सुहासिनी कीर्तिकर, डॉ. ज्योती ठाकरे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रा. डॉ. प्रदीप ढवण, अरुण म्हात्रे, मीनाक्षी जयकर, स्वाती गावडे, शिवाजी गावडे, दीपा ठाणेकर, मोहन पाटील आदी उपस्थित होते.

चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार

मराठी भाषा प्रशिक्षणासाठी सुमारे चार हजार शिक्षक सहभागी होणार असून प्रत्येक महिन्यातील चार शनिवार आणि रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चालकांची मराठी भाषेवरील व्यावहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण पेंद्रांमध्ये तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.

Comments are closed.