ऐरोलीत नालेसफाईनंतरही गुडघ्याइतका गाळ, शिवसेनेच्या रणरागिणींनी केली पोलखोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहरातील नालेसफाईत कशी बनवाबनवी केली याचा भांडाफोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज दुसऱ्या दिवशीही केला. ऐरोली परिसरातील नाल्यांची सफाई करण्यात आल्यानंतरही या नाल्यांमध्ये गुडघ्यापर्यंत गाळ असल्याची पोलखोल शिवसेनेच्या रणरागिणींनी नाल्यात उतरून केली. नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदार धूळफेक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नवी मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नवी मुंबईतील नाल्यांची सफाई पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १५ मे ही डेडलाईन दिली होती. मात्र ही डेडलाईन संपून आठवडा उलटला असला तरी शहरातील नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही. ठेकेदारांनी फक्त दर्शनी भागातील नाले साफ करून बाकीच्या नाल्यांमध्ये कचरा तसाच ठेवला आहे. शिवसैनिकांनी काल तुर्भे एमआयडीसीतील नालेसफाईचा पंचनामा केल्यानंतर आज ऐरोली आणि घणसोलीमधील नालेसफाईची पोलखोल केली. उपशहर संघटक मंजू म्हात्रे, माजी नगरसेविका संता काटे आणि उपविभागप्रमुख शैलेश म्हात्रे यांनी ऐरोलीतील सेक्टर ३ मधील नाल्यांमध्ये उतरून ठेकेदाराची बनवाबनवी उघड केली. या नाल्यात नालेसफाईनंतरही गुडघ्यापर्यंत गाळ आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंदें, विधानसभाप्रमुख अतुल कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी, संतोष घोसाळकर, एकनाथ सुळके, विजय पाटील, आशा काळे, जीतू केणी, मंदार परब आदी उपस्थित होते.

Comments are closed.