नो Shake Hands अन् विराट कोहली अन् ट्रॅव्हिस हेडमधील वाद पेटला; हेडची 4 शब्दांची पोस्ट व्हायरल

विराट कोहली ट्रॅव्हिस हेड हँडशेक वाद : आयपीएल 2026 मधील सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात 22 मे रोजी झालेल्या सामन्यानंतरचा वाद सध्या क्रिकेट जगतात चांगलाच चर्चेत आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडशी हस्तांदोलन (Handshake) करण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर आता ट्रॅव्हिस हेडने सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर करत या वादात आणखी तेल ओतले आहे, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेडची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल… (Virat Kohli Travis Head Handshake Controversy)

हैदराबादमध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात एसआरएचने आरसीबीवर 55 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर काही तासांतच हेडने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. एका फोटोसोबत त्याने फक्त चार शब्दांचे कॅप्शन दिले की, Keep the body guessing. वरवर पाहता ही एखाद्या फिटनेस किंवा वर्कआउटशी संबंधित पोस्ट वाटत असली, तरी क्रिकेट चाहत्यांच्या मते, हा हेडने विराट कोहलीला दिलेला अत्यंत चतुर आणि अप्रत्यक्ष टोमणा आहे.

मैदानातील स्लेजिंगने पेटवला वाद (Virat Kohli Travis Controversy)

खरंतर, हेड आणि कोहली यांच्यातील बाचाबाची, जी बंगळूरच्या फलंदाजीदरम्यान झाली. विराट कोहली क्रीजवर होता आणि ट्रॅव्हिस हेडने त्याच्याबद्दल काही टिप्पणी केली. प्रत्युत्तरात, कोहलीने हेडला स्वतः गोलंदाजी करण्याचे आव्हान दिले. या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, कोहली या डावात जास्त वेळ टिकला नाही, पण शेवटी ट्रॅव्हिस हेड गोलंदाजीसाठी आला. डावाच्या 19 व्या षटकात हेडने गोलंदाजीची सूत्रे हाती घेतली आणि दुसऱ्याच चेंडूवर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारची विकेट घेतली.

हस्तांदोलन नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल

या पराभवाचा राग आणि हेडने दिलेले प्रत्युत्तर कोहलीच्या मनात कायम होते. सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा हेडने स्पोर्ट्समन स्पिरीट दाखवत कोहलीकडे हात पुढे केला. मात्र, कोहलीने पूर्णपणे दुर्लक्ष करत हेडला डावलले आणि तो पुढे निघून गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, हेडला डावलणाऱ्या कोहलीने त्याच्याच बाजूला उभ्या असलेल्या हैदराबादच्या इतर खेळाडूंशी आणि कर्णधार पॅट कमिन्सशी मात्र अत्यंत आनंदाने हस्तांदोलन केले. दोन्ही आक्रमक खेळाडूंमधील हा वाद येत्या काळात आणखी काय वळण घेतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

IPL Playoffs: आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?

आणखी वाचा

Comments are closed.