डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; IRGC ने एक कट रचला

pc: saamtv
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिच्या हत्येचा कट उघड झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या एका दहशतवाद्याने इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला होता. द पोस्ट वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याला आपल्या गुरूचा बदला घ्यायचा होता.
सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात त्याचा गुरू आणि इराणचा लष्करी कमांडर कासिम सुलेमानी मारला गेला होता. इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका दहशतवाद्याला सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. 32 वर्षीय मोहम्मद बकर साद दाऊद अल-सादी असे त्याचे नाव असून तो इराकी नागरिक आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकन सैन्याने ठार केले. सहा वर्षांपूर्वी बगदादमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणारा दहशतवादी कमांडर कासिम सुलेमानी यांना आपला गुरू मानत होता आणि त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ट्रम्प कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करत होता. आरोपी अल-सादीने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबीयांना विशेषतः त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांना ठार मारण्याची शपथ घेतली होती. तपासादरम्यान, सुरक्षा दलांनी इवांका ट्रम्प यांच्या अल-सादीच्या फ्लोरिडा येथील आलिशान घराच्या संपूर्ण ब्लूप्रिंट्स जप्त केल्या. त्यांनी इवांका ट्रम्प यांच्या घराची पाहणी केली.
Comments are closed.