IPL 2026 – प्लेऑफआधी RCB चा धुरंधर मायदेशी परतला, कारण काय?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2026 च्या लीग टप्प्यात दमदार कामगिरी करत 14 पैकी 9 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. आता प्लेऑफमध्ये 26 मे रोजी धर्मशाळा येथे गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर-1 सामना खेळायचा असताना संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज जेकब बेथेल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडत इंग्लंडला परतला आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यावेळी बेथेलच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अखेर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे माहिती देत बेथेल इंग्लंडला परतत असल्याचे स्पष्ट केले. आता तो तिथे इंग्लंडच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार घेणार आहे.
आयपीएलनंतर बेथेलला इंग्लंडच्या कसोटी संघात सामील व्हायचे होते आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवडही झाली आहे. 4 जूनपासून लॉर्ड्सवर होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तो वेळेत पूर्णपणे तंदुरुस्त होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.