14 पैकी 10 सामन्यात पराभव, शेवटचा सामनाही MI ने गमावला; हार्दिक पांड्या बोल बोल बोलला, एक चूकही

IPL 2026 हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल 2026 मधील (IPL 2026) आपला शेवटचा साखळी सामना गमावला. राजस्थान रॉयल्सने 30 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव करून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली, मुंबईला गेल्या तीन हंगामामध्ये दुसऱ्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयश आले. राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर, कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) या पराभवासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हींना जबाबदार धरले. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या होत्या. (IPL 2026 Hardik Pandya)

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या काय म्हणाला? (Hardik Pandya Mumbai Indians)

राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, आमच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत 73 धावा दिल्या. ज्यामुळे सामन्यात मोठा फरक पडला. 206 धावांचे लक्ष्य गाठण्यासारखे होते, परंतु फलंदाजीतील चुका मुंबई इंडियन्सला महागात पडल्या, असं हार्दिक पांड्याने सांगितले. आमच्या गोलंदाजीत कदाचित 10-15 धावा जास्त दिल्या गेल्या. अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणे सोपे नसते. जर तुम्ही शेवटच्या पाच षटकांमध्ये 1-2 चौकार रोखू शकलात, तर विरोधी संघ 12-15 धावा कमी करेल. आम्ही ते करण्यात अपयशी ठरलो आणि शेवटच्या पाच षटकांमध्ये 73 धावा देणे आमच्यासाठी नुकसानकारक ठरले.

206 धावांचे लक्ष्य गाठणे अशक्य नव्हते- हार्दिक पांड्या (Mumbai Indians IPL 2026)

206 धावांचे लक्ष्य गाठणे अशक्य नव्हते. तो म्हणाला, ही धावसंख्या गाठण्यासारखी होती, पण पॉवरप्लेमध्ये आमच्या खूप विकेट्स पडल्या. जेव्हा मी फलंदाजीला गेलो, तेव्हा चेंडू बॅटवर चांगला येत होता. आम्हाला फक्त खेळपट्टीवर टिकून राहून चांगले फटके खेळण्याची गरज होती, असंही हार्दिक पांड्या म्हणाला. दरम्यान, आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक होती. मुंबईने स्पर्धेत 14 सामने खेळले, त्यापैकी केवळ चार जिंकले. मुंबईने 2020 पासून एकही विजेतेपद जिंकलेले नाही. त्यांच्या सहाव्या ट्रॉफीची प्रतीक्षा गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे.

प्लेऑफसाठी चार संघ ठरले- (IPL 2026 Playoffs)

आयपीएल 2026 च्या हंगामातील साखळी फेरीचे सामने संपले असून आता प्लेऑफच्या लढती (IPL 2026 Playoffs Schedule) होणार आहे. आयपीएलच्या प्लेऑफसाठी 10 संघापैकी पात्र ठरणाऱ्या चार संघांची नावेही निश्चित झाली आहेत. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, तसेच राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. आयपीएल 2026 चा अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

IPL 2026 प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक- (IPL 2026 Playoffs Schedule)

प्लेऑफचे सामने गुणतालिकेतील (IPL Points Table) स्थानांवर आधारित निश्चित केले जातात. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये पहिला ‘क्वालिफायर’ सामना खेळवला जातो. याचा अर्थ असा की, 26 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात ‘क्वालिफायर 1’ चा सामना रंगेल. दरम्यान, गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये ‘एलिमिनेटर’ सामना खेळवला जातो. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामना 27 मे रोजी खेळला जाईल. यानंतर, क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटरमध्ये विजयी झालेला संघ यांच्यात क्वालिफायर 2 मध्ये भिडतील.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:

संबंधित बातमी:

IPL 2026 Playoffs Schedule: 4 संघ, 4 सामने…पहिले आरसीबी आणि गुजरात, मग राजस्थान आणि हैदराबाद भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक

आणखी वाचा

Comments are closed.