Tulsi Kadha : नियमित तुळशीचा काढा पिण्याने शरीरावर काय परिणाम होतो?
भारतात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाहीतर आयुर्वेदातही तुळशीला ‘औषधांची राणी’ मानले गेले आहे. बदलत्या हवामानात खोकला, सर्दी यांसारख्या समस्यांवर आपण अनेकदा तुळशीचा काढा पितो. पण तुम्हाला माहीत आहे का, की नियमितपणे तुळशीचा काढा प्यायल्याने तुमच्या शरीरात आश्चर्यकारक असे बदल होतात. आजच्या लेखात नियमित तुळशीचा काढा पिण्याने शरीरावर काय परिणाम होतो? हे सविस्तरपणे पाहूयात.
रोगप्रतिकारशक्ती वाढते –
तुळशीमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्याची क्षमता असते, ज्यामुळे हंगामी आजारांपासून बचाव होतो.
श्वसनाचे विकार दूर होतात –
खोकला, दमा आणि सर्दी यांसारख्या समस्यांवर तुळशीचा काढा फायदेशीर ठरतो.
हेही वाचा – Body Heat Tolerance : मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकतं?
पचनक्रिया सुधारते –
तुळशीच्या काढा नियमित घेतल्यास अपचन, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या दूर होतात.
शरीर डिटॉक्स होते –
तुळशीचा काढा शरीरातील रक्ताची शुद्धी करतो आणि यकृताचे कार्य सुधारून विषारी पदार्थ बाहेर टाकतो.
मानसिक ताण कमी होतो –
तुळशीतील गुणधर्मांमुळे कॉर्टिसॉल (स्ट्रेस हार्मोन) नियंत्रणात राहून तणाव कमी होतो.
कसा बनवायचा?
- तुळशीची काही पाने घेऊन स्वच्छ धुवावीत.
- त्यानंतर घरात असलेले हळकुंड, सुंठ आणि आलं बारीक किसून घ्यावे.
- दुसरीकडे गॅसवर एक पातेलं ठेवून त्यात काढ्यासाठी पाणी ठेवा.
- उकळत असलेल्या पाण्यात लवंगा, हळकुंड, मिरी टाका.
- आता त्यात तुळशीची पाने आणि चवीनुसार गूळ मिक्स करा.
- आता काढा कमीत कमी 10 मिनिटं उकळवून घ्यावा.
हेही वाचा – Health Tips : हेल्दी राहण्यासाठी काय खावेपेक्षा किती खावे महत्त्वाचे असते का?
Comments are closed.