सरकार शेतकऱ्याला फसवतेय, व्यापाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणारी नाफेड ही बोगस संस्था; अंबादास दानवे यांची टीका
कांदाप्रश्नावरून नाशिकच्या चांदवड येथे महाविकास आघाडीकडून रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, विधानपरिषेदेतील आमदार अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना व नाफेडला फटकारले आहे.
”नाफेड ही बोगस संस्था आहे. ती शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या हिताचे संसरक्षण करते. ही संस्था शेतकरी विरोधी झाली आहे. कांद्याच्या मार्केटमध्ये येऊन नाफेडने कांदा खरेदी करावा ही आमची मागणी आहे. हे सरकार शेतकऱ्याला फसवतेय. नुसत्या घोषणा करतेय. पण थेट खरेदी कुठेय? सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करायला हवा व त्याला किमान अडिच तीन हजार रुपयांचा हमी भाव द्यायला पाहिजे”, असे अंबादास दानवे म्हणाले.
Comments are closed.