अभिषेकवर पोलिसांचा छापा
मॉनिटर आणि अनेक वस्तू जप्त; बेकायदेशीर बांधकामाची नोटीस
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर सोमवारी पोलिसांच्या एका पथकाने छापा टाकला. पोलिसांनी त्याच्या घरातून मॉनिटरसह अनेक वस्तू जप्त करून ताब्यात घेतल्या. अभिषेक बॅनर्जीचे घर 188-ए हरीश मुखर्जी रोडवर आहे. सोमवार, 25 मे रोजी, कोलकाता पोलिसांचे एक पथक अभिषेक बॅनर्जीच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मॉनिटरसह अनेक वस्तू ताब्यात घेतल्या. बेकायदेशीर बांधकामप्रकरणी कोलकाता महानगरपालिकेने जारी केलेल्या नोटीसनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
Comments are closed.