भरधाव रेल्वेची स्कूल बसला धडक, तीन विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू
उत्तर बेल्जियममध्ये मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव रेल्वेने शाळेच्या बसला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये तीन विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. बुगेनहाउट (Buggenhout) गावातील एका रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला.
‘एएफपी’ (AFP) या वृत्तसंस्थेला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सकाळी सुमारे ८:०८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) घडला. या मिनीबसमध्ये सात शाळकरी मुले, एक पर्यवेक्षक आणि चालक असे एकूण 9 जण होते. ही मिनीबस रेल्वे क्रॉसिंग पार करत असताना एका ट्रेनने तिला धडक दिली. अपघातानंतर मिनीबसची अगदी चेपलेल्या अवस्थेत होती.
अपघातानंतर तत्काळ घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Comments are closed.