पावसाळ्यात काय खावे आणि काय टाळावे ?
पावसाळ्यात गरमा गरम भजी, वडापाव, मसालेदार झणझणीत चिकन-मटन खाण्याचा विचार करत असाल तर थांबा.कारण पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते, त्यामुळे पचनशक्ती कमी होते आणि संसर्गाचा धोका वाढतो.म्हणूनच या दिवसात काही पदार्थ खाणे टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.कोणते आहेत हे पदार्थ ते बघूया.
1. रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ
वडापाव, पाणीपुरी, भेळ यांसारखे उघडे पदार्थ धूळ, पावसाचे पाणी आणि जंतूंमुळे दूषित होऊ शकतात.
2. पालेभाज्या
मेथी, पालक, कोथिंबीर यामध्ये पावसाळ्यात जंतू आणि किडी वाढण्याची शक्यता जास्त असते.
3. कच्चे सॅलड
बाहेरचे कच्चे सॅलड किंवा नीट न धुतलेल्या भाज्या खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात.
4. सी फूड
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने या काळात समुद्री खाद्य टाळणे चांगले.
5. तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थ
भजी, समोसे, चिप्स यांसारखे पदार्थ पचनावर ताण आणतात.
6. जास्त थंड पेये
फ्रिजमधील थंड पेये किंवा आईस्क्रीममुळे घसा दुखणे आणि सर्दी होऊ शकते.
7. कापून ठेवलेली फळे
बराच वेळ उघडी ठेवलेली फळे लवकर खराब होतात आणि त्यात जंतू वाढतात.
पावसाळ्यात काय खावे?
गरम आणि ताजे अन्न
सूप, काढा, हळदीचे दूध
उकळलेले पाणी
हंगामी फळे
Comments are closed.