लोकांना सोन्याची ऍलर्जी असते.
सोने परिधान करून आल्यास मानतात वाईट
पूर्ण जगात सोने आणि हिऱ्यांना श्रीमंती आणि सामाजिक प्रतिष्ठेचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. भारतासारख्या देशांमध्ये विवाह आणि सणासुदीच्या काळात सोन्याचे दागिने परिधान करण्याची जुनी परंपरा राहिली आहे. परंतु काही देशामंध्ये अत्याधिक सोने परिधान करणे किंवा स्वत:च्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणे लोकांना गंभीर स्वरुपात नाराज करू शकते.
स्कँडिनेवियन देश म्हणजेच स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्कच्या समाजात सोने आणि मूल्यवान दागिन्यांवरून एक अत्यंत अजब आणि चकित करणारी धारण दिसून येते. या समृद्ध देशांमध्ये जर तुम्ही स्थानिक नागरिकासमोर स्वत:चे महाग दागिने प्रदर्शित केले तर लोक अजिबात प्रभावित होणार नाहीत. याच्या उलट तुमच्या या कृत्यामुळे ते अधिक नाराज होतील. कारण तेथे श्रीमंतीचे प्रदर्शन करणे सर्वात वाईट वर्तन मानण्यात येते. या अनोख्या सामाजिक विचारामागे तेथीलल समाजात शतकांपासून वसलेली एक अलिखित पारंपरिक व्यवस्था आहे, ज्याला जगभरात ‘लॉ ऑफ जांटे’ नावाने ओळखले जाते. या नियमाची सुरुवात 1933 मध्ये प्रसिद्ध लेखक एक्सेल सँडेमॉसच्या पुस्तकाद्वारे झाली होती. पुढे जात या देशांच्या लोकांच्या मनांवर याने इतकी खोल सामाजिक छाप पाडली की हे त्यांच्या जीवनशैलीचा भाग ठरले.
या प्राचीन अलिखित सामाजिक नियमाचा सरळ सिद्धांत म्हणजे कुठलाही व्यक्ती स्वत:ला समाजातील इतर लोकांपेक्षा अधिक श्रीमंत किंवा खास सिद्ध करू शकत नाही. या खास संस्कृतीच्या अंतर्गत देशाच्या सर्व नागरिकांना पूर्णपणे एक समान दर्जा देण्यात येतो. कुठलाही व्यक्ती अब्जाधीश असला किंवा कुणी ऑफिसमध्ये काम करणारा साधारण कर्मचारी असला तरीही समाजाच्या नजरेत दोघांना सन्मान आणि दर्जा समान असतो.
सोने, चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने घालणे समाजाच्या इतर लोकांना मानसिक रुपात कमी दाखविण्याचे गैरकृत्य असल्याचे येथील लोकांचे मानणे आहे. जर तुम्ही महाग गोष्टी इतरांसमोर वारंवार प्रदर्शित करत असाल तर याला समाजात अहंकार आणि स्वत:ला श्रेष्ठ सिद्ध करण्याची नकारात्मक जिद्द मानण्यात येते.
याचमुळे या देशात राहणारे अत्यंत धनाढ्या लोकाही नेहमी साधारण जीवन जगणे पसंत करतात. या खास परंपरेमुळे स्कँडिनेवियन देशांमधील धनाढ्या लोकाही सामान्य कारमधून प्रवास करतात. जर कुणी विदेशी पर्यटक किंवा स्थानिक नागरिक भरभक्कम सोन्याची चेन, ब्रेसलेट किंवा अंगठी परिधान करून फिरत असल्यास लोक त्याला सन्मान देण्याऐवजी पूर्णपणे त्याच्यापासून अंतर राखू लागतात.
Comments are closed.