बिहार विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक
पाटणा :
बिहार विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 10 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होत निकाल जाहीर केला जात आहे. या 10 जागांपैकी एक जागा ही नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती. निवडणुकीची अधिसूचना 1 जून रोजी जारी केली जाणार आहे. तर उमेदवार 8 जूनपर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत. या निवडणुकीसाठी बिहार विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत.
Comments are closed.