सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, एसआयआर मोहीम वैध असल्याचा निर्वाळा, निवडणूक आयोगाच्या निर्णय

SIR वर सर्वोच्च न्यायालय: पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी वादग्रस्त आणि प्रचंड चर्चेचा विषय ठरलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात एसआयआर (SIR) मोहीम वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने यासंदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. यावेळी खंडपीठाने आपले निरीक्षण नोंदवताना म्हटले की, निवडणूक आयोगाने (Election Commission) आपल्या अधिकाराचा वापर केला आहे. आपल्या अधिकाराच्या कक्षेबाहेर त्यांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे एसआयआर मोहीमेला असंवैधानिक ठरवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. (Politics News)

सर्वोच्च न्यायालयाने एसआयआर संदर्भाताली याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला होता. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने एसआयआर मोहीम वैध असल्याचा निकाल दिला. या प्रक्रियेला चुकीचे ठरवता येणार नाही. मतदार याद्यांचा फेरआढावा घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार हा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. विशेष मतदार यादी पुर्ननिरीक्षण करण्याचे आणि सगळ्या मतदार याद्यांचे पुनरावलोकन करण्याचे अधिकार घटनेने दिले आहेत. संविधानातील निवडणूक आयोगाशी संबंधित कलमांमध्ये अनुच्छेदात लिहलं आहे, निवडणूक आयोग मतदार यादी तयार करेल आणि तिची फेररचना करेल. त्यामुळे एसआयआर मोहीम वैध ठरते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने या राज्यात एसआयआर मोहीम राबवली होती. त्यामध्ये निवडणूक यादीतील जवळपास 90 लाख मतदारांना वगळण्यात आले होते. या निर्णयानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. निवडणूक यादीतून नावं वगळण्यात आलेल्यांमध्ये बहुतांश मुस्लीम मतदारांचा समावेश असल्याचा आणि हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यापैकी काही मतदारांना पुन्हा मतदार यादीत पुन्हा सामावून घेण्यात आले होते. मात्र, हे प्रमाण अत्यंत नगण्य होते. यामुळे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

सध्या SIR ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. राज्यातील अनेक भागामध्ये SIR सर्वे केला जात आहे. यासोबत ज्यांची नाव SIR मध्ये नसतील त्यांचे नाव मतदार यादीत वगळ्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे. SIR काय आहे? 2002 च्या  लिस्टमध्ये आपलं नाव आहे की नाही? यासोबत आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव कसे अॅड करायचे? याची संपूर्ण अशी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

सर्वात आधी आपण SIR काय आहे? ते समजून घेऊयात…

Special Intensive Revision म्हणजेच SIR.. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मतदार यादी दुरुस्ती करणे. पण याची प्रक्रिया जरा वेगळी असते. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डिप्लिकेट मतदार वगळ्यात येतात आणि नवीन मतदार यादीमध्ये अॅड केले जाते.

अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी SIR दरम्यान बीएलओ (BLO – बूथ लेव्हल ऑफिसर) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात.

या प्रक्रियेत नक्की काय होते?

बीएलओ स्वतः घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही, याची खात्री करतात.

काही बदल करायचा असल्यास आवश्यक फॉर्म भरून घेतात.

मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावे यादीतून वगळली जातात.

18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातात.

2002 च्या SIR लिस्टमध्ये नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जायचं आहे, किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे.

त्यानंतर लॉगिन करून घ्यायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील.

01. Search your name in SIR यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ टाकून तुमचं नाव या यादीत आहे की नाही ते चेक करायचं आहे.

02. आणि दुसरं ऑप्शन आहे Last SIR E-Roll यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गाव किंवा मतदान केंद्र टाकल्यानंतर तुम्हाला VIEW यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर लिस्ट आली असेल. त्यात तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा. जर नसेल तर तुम्हाला SIR यादीत नाव अॅड करावं लागेल.

त्यासाठी तुम्हाला तुमचं मतदारकार्ड, आधारकार्ड आणि तुमच्या पालकांचं नाव 2002 च्या SIR यादीत असणं बंधनकारक आहे.

बीएलओ (BLO) पडताळणीसाठी तुमच्या घरी आले आणि त्यांना असे आढळले की तुम्ही त्या पत्त्यावर आता राहत नाही (स्थलांतरित झाले आहात) किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तरच नाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.

आणखी वाचा

Voter List Revision : … तर मतदार यादीतून तुमचंही नाव गायब, महाराष्ट्रात मतदार याद्यांची मॅपिंग सुरु, 2002 च्या यादीशी तुमचं नाव जुळतंय का?

BJP SIR process in Maharashtra: पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात

आणखी वाचा

Comments are closed.