दहशतवादाला खतपाणी घालण्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हिंदुस्थानचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

”पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालत आहे. त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील” अशा शब्दात हिंदुस्थानने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत खडेबोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्रातील हिंदुस्थानचे राजदूत हरिश परवथनेनी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.

न्यूयॉर्कमध्ये युएनएससी (UNSC) च्या चर्चेदरम्यान बोलताना, संयुक्त राष्ट्रांमधील हिंदुस्थानचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत हरीश परवथनेनी यांनी सडेतोड उत्तर देत म्हटले की, “पाकिस्तानने आज केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना मला उत्तर द्यावे लागत आहे. त्यासाठी मला गेल्या अनेक वर्षातली सत्य परिस्थिती सांगावी लागेल. स्वातंत्र्य काळापासूनच पाकिस्तानकडून हिंदुस्थानविरोधात दहशतवादाला खतपाणी घातले जातेय. हिंदुस्थान स्वतंत्र झाला तेव्हापासूनच पाकिस्तानच्या सीमेपलीकडील दहशतवादाशी लढा देत आहे”, असे परवथनेनी म्हणाले.

”पाकिस्तानचा कायम हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असलेल्या भूभागांवर डोळा राहिला आहे. पाकिस्तानने दहशतवादाचा वापर हिंदुस्थानवर अनेकदा हल्ले केले आहेत. अशा सीमेपलीकडील दहशतवादापासून स्वतःचे रक्षण करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. सीमेपलीकडील दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काय परिणाम होतात, हे पाकिस्तानला भोगावेच लागतील”, असेही परवथनेनी यांनी पाकिस्तानला सुनावले

Comments are closed.