पाकिस्तानी मुले चुकीचा इतिहास शिकतायत, माझे पूर्वज हिंदू होते; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची कबूली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत त्यांचे पूर्वज हे हिंदू असल्याची कबूली दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी पाकिस्तानातील मुलांना चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याचे देखील म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात वादाला तोंड फुटलं आहे.

पाकिस्तानातील मुस्लिम त्यांच्या हिंदू पूर्वजांचा द्वेष करतात. पाकिस्तानातील अर्ध्याहून अधिक लोकं त्यांचे पूर्वज इराण व सौदी अरेबियावरून आल्याचा दावा करतात. हा भ्रम निर्माण करण्यात आला आहे. पाकिस्तानची नवी पिढी त्यांच्या संस्कृतीपासून दुरावली जावी म्हणून हे करण्यात आले आहे, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.

”पाकिस्तानाने हिंदू शासकांचा इतिहास पुसून टाकण्यात आला आहे. आपण आपल्या इतिहासातून चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांचा इतिहास पुस्तकातून हटवला आहे. कारण ते हिंदू होते. ते माझे पूर्वज होते. यामुळे मी पाकिस्तानी म्हणून कमी ठरतो का? पाकिस्तानातील इतिहासाची पुस्तकं अशा लोकांनी लिहली आहेत ज्यांना भावी पिढ्यांना एका विशिष्ठ मानसिकेतेने घडवायचे होते”, असे देखील आसिफ म्हणाले.

Comments are closed.