राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा ‘तो’ इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव…’
छगन भुजबळ राष्ट्रवादी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक मंगळवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही बैठक वादळी ठरली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत पक्षाच्या एकाही नेत्याने आपली बाजू घेतली नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सुनील तटकरे आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचेही समजते. याच बैठकीत छगन भुजबळ यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics News)
2029 च्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेईल माहिती नाही. त्यापेक्षा आपण 288 जागांची तयारी करायला हवी. तसेच मतदारसंघ वाढत असतील तर त्याबाबत देखील आगामी प्लानिंग करायला हवी. सध्या राबवण्यात येणारी विशेष मतदार यादी पुर्ननिरीक्षण SIR मोहीम ही एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी मतं कमी करण्याचा डाव आखला आहे. यावर आपण वेळीच उपाययोजना करायला हवी, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. याशिवाय, पुढील दोन दिवसांमध्ये बीएलओ नेमण्यात यावेत आणि तत्काळ त्यांचे ट्रेनिंग देखील सुरु करण्यात यावे, अशी गरजही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा पक्षातील नेत्यांना एकजुटीने राहण्याचा सल्ला
या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकजुटीने राहण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकजूट महत्त्वाची असून सर्वांनी एकाच आवाजात बोलले पाहिजे, असा संदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमदारांना दिला. पक्षाची एकजूट सर्वोच्च आहे, सर्वांनी एकाच भूमिकेतून बोलले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत सर्वांनी एकमताने ठराव मंजूर करत येणाऱ्या काळात सुनेत्रावहिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच वहिनी जो निर्णय घेतील, त्यामागे सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही देण्यात आली.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.