श्रेयस अय्यर रेसमधून OUT? टीम इंडियाच्या टी-20 कर्णधारपदासाठी अचानक पुढे आला RCBचा सायलेंट किलर

टीम इंडिया T20 कॅप्टन अपडेट: अनुभवी आंतरराष्ट्रीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक खळबळजनक दावा केला आहे. त्याच्या मते, रजत पाटीदार आता भारतीय संघाच्या भावी कर्णधारपदाच्या शर्यतीत मुख्य दावेदार म्हणून सामील झाला आहे. देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतील पाटीदारच्या कामगिरीमुळे निवड समितीसमोरील समीकरणे बदलली असून, त्याने फलंदाज श्रेयस अय्यरला थेट आव्हान दिले आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवरील ‘ॲश की बात’ (Ash Ki Baat) या विशेष कार्यक्रमात बोलताना अश्विनने रजत पाटीदारच्या फलंदाजीचे तांत्रिक विश्लेषण केले. विदेशी वेगवान गोलंदाजांविरुद्ध पाटीदारने ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेतला, त्याचे अश्विनने कौतुक केले.

विशेषतः दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाविरुद्ध मारलेल्या एका षटकाराचा उल्लेख करत अश्विन म्हणाला की, “रजतने कागिसो रबाडाविरुद्ध बॅकफूटवर जाऊन मारलेला तो षटकार केवळ त्या दिवसाचाच नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम शॉट होता. त्या पोझिशनमधून त्याने एवढी ताकद कशी निर्माण केली, हे माझे मलाच समजत नाहीये.”

श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाच्या दाव्याला धोका

पाटीदारच्या या खेळीमुळे राष्ट्रीय संघाच्या नेतृत्वाच्या रचनेवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. या सामन्यापूर्वी, संघ व्यवस्थापनाच्या नेतृत्वाच्या चर्चेत श्रेयस अय्यरचे नाव आघाडीवर होते. मात्र, पाटीदारच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आता आगामी मर्यादित षटकांच्या (White-Ball) मालिकेसाठी तो कर्णधारपदाचा एक भक्कम पर्याय म्हणून पुढे आला आहे. अश्विन पुढे म्हणाला, “या खेळीपूर्वी श्रेयस अय्यर फलंदाजी आणि कर्णधारपदाच्या शर्यतीत थोडा पुढे होता, यात शंका नाही. परंतु, आजच्या या उत्कृष्ट खेळीनंतर रजत पाटीदार थेट त्याच्या बरोबरीने उभा राहिला आहे.”

राशिद खानच्या फिरकीचा धुव्वा

पाटीदारच्या फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या कौशल्याचाही अश्विनने गौरव केला. अफगाणिस्तानचा फिरकी जादूगार राशिद खानच्या गोलंदाजीवर पाटीदारने ज्या प्रकारे वर्चस्व गाजवले, ते थक्क करणारे होते. खेळपट्टीचा योग्य वापर करत त्याने राशिदला एक्स्ट्रा कव्हरवरून षटकार ठोकले.

“रजत फिरकी उत्तम खेळतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण आज त्याने वेगवान गोलंदाजीचा ज्या प्रकारे सामना केला, ते अधिक प्रभावी होते. राशिद खानविरुद्ध पुढे सरसावत, बॉलच्या टप्प्यापर्यंत पोहोचून एक्स्ट्रा कव्हरवरून षटकार मारण्याची क्षमता खूप कमी फलंदाजांमध्ये असते. ही शुद्ध क्लास फलंदाजी आहे,” असे म्हणत अश्विनने पाटीदारच्या अष्टपैलू क्षमतेवर शिक्कामोर्तब केले.

हे ही वाचा –

कॅप्टन कूलचा नवा गेम प्लॅन! IPL 2027 मध्ये कोच बनून परतणार MS धोनी, सीएसकेकडून मोठी हिंट, निवृत्ती कन्कर्म?

आणखी वाचा

Comments are closed.