Mumbai News – सांताक्रुझ डेपोमध्ये बेस्ट बसला आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंधन भरण्यासाठी नेत असताना बेस्टमध्ये आग लागल्याची घटना सांताक्रुझ बस डेपोमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

सदर बसच्या क्लचमध्ये बिघाड झाल्यामुळे ती दुरुस्तीसाठी आगारात थांबवण्यात आली होती. बसची दुरुस्ती झाल्यानंतर चालक बसमध्ये इंधन भरण्यासाठी तिला आगारातील इंधन केंद्राकडे घेऊन जात होता. बस चालू असतानाच मध्यरात्री 2.45 वाजेच्या सुमारास चालकाच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि बसला आग लागली. MUTSPPL च्या कर्मचाऱ्यांनी 20 अग्निशामक यंत्रांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल पहाटे 3.10 वाजता घटनास्थळी दाखल झाले आणि बसवर पाण्याचा फवारा मारून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Comments are closed.