IPL 2026 – वैभव सूर्यवंशी म्हणजे तोडफोड कार्यक्रम! ख्रिस गेल गेलच्या 14 वर्षांच्या विक्रमाला हादरा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीने क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सुरू असलेल्या आयपीएल 2026 च्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात वैभवने एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा ख्रिस गेलचा 14 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला. ख्रिस गेलने एकाच हंगामात 59 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता, मात्र या तरुण सलामीवीराने वादळी फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत 61 षटकार ठोकत हा जुना विक्रम मागे टाकत आयपीएलच्या इतिहासात एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. तसेच वैभवने प्लेऑफमधील सर्वाधिक वेगवान अर्धशतक (16 चेंडूंमध्ये) झळकावत गोलंदाजांची धुलाई केली आहे.

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. हैदराबादच्या आमंत्रनाचा राजस्थानच्या सलामीवीरांना खरपूस समाचार घेतलाय. यशस्वी जयसवाल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनीही संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे. वैभव सूर्यवंशीने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत 20 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 2 चौकारांच्या जोरावर 60 धावांची खेळी केली असून त्यांचा धडाका अजूनही सुरूच आहे. तर यशस्वी 15 चेंडूंमद्ये 19 धावा करत त्यांला चांगली साथ देत आहे. 6 षटकांचा खेळ संपला तेव्हा राजस्थानने बिनबाद 80 धावा चोपून काढल्या आहेत.

आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम पाहता. या यादीमध्ये वैभव सूर्यवंशी आता पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. या क्रमवारीत दुसऱ्या क्रमकांवर ख्रिस गेल असून त्याने 2012 साली 59 षटकार खेचले होते. तसेच तिसऱ्या क्रमांकावर आंद्रे रसेल (52, 2019), ख्रिस गेल (51, 2013) आणि जोस बटलर (45, 2022) या खेळाडूंचा समावेश आहे.

Comments are closed.