बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भ
बीड क्राईम न्यूज : बीड (Beed) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील सावत्र आई (Stepmother) आणि मुलाच्या प्रेमसंबंधांचा अंबाजोगाई येथे अत्यंत थरारक शेवट झाला आहे. समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने सुरुवातीला मुलाने विष प्राशन करून आयुष्य संपवले. त्यानंतर, प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईनेही रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Beed Crime News: बापाच्या नकळत जुळले सावत्र आईशी सूत; दोघेही झाले फरार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट (Divorce) झाला होता. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. त्यांचा संसार सुरू असतानाच, पहिल्या पत्नीचा 21 वर्षीय मुलगा अनिल पवार याचे आपली सावत्र आई अनिता हिच्याशी प्रेमसंबंध (Love Affair) जुळले. या दोघांमधील अनैतिक संबंध इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी अनिल आणि त्याची सावत्र आई अनिता हे दोघेही घरातून थेट तेलंगणा (Telangana) राज्यात पळून गेले.
Beed Crime News: पोलिसांनी तेलंगणातून घेतले ताब्यात
आपली पत्नी आणि मुलगा दोघेही अचानक बेपत्ता झाल्याने हताश झालेल्या पतीने केज पोलीस ठाण्यात (Police Station) धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे थेट तेलंगणा गाठले आणि पळून गेलेल्या त्या दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईनंतर दोघांनाही बीडमध्ये परत आणण्यात आले होते.
Beed Crime News: बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं
आपले प्रेमसंबंध आता संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला समजले आहेत, या भीतीपोटी अनिल याने विषारी औषध प्राशन केले. त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच अनिलचा मृत्यू झाला.
तर, आपला प्रियकर (जो नात्याने सावत्र मुलगा होता) अनिल याच्या मृत्यूची बातमी समजताच अनिता हिला तीव्र धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने तिने रुग्णालयातून बाहेर पडून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. एकाच वेळी दोघांनीही टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.