IPL 2026 – वैभवने तर पूर्णपणे…,15 वर्षीय वादळाचं कौतुक थांबेना! श्रीलंकेच्या दिग्गजाने थोपटली पाठ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपुष्टात आला. गुजरातने फायनलमध्ये धडक मारली असून उद्या (31 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांची लढत होणार आहे. राजस्थानचा स्पर्धेतला प्रवास संपला असला तरी त्यांचा हुकूमी एक्का 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा जलवा अजूनही कायम आहे. राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा दिग्गज माजी खेळाडू कुमार संगकारा यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं असून वैभव सूर्यवंशी हिंदुस्थानी संघात पदार्पण करण्यासाची पूर्णपणे सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संगाकाराने वैभवच्या परिपक्वतेचे आणि संयमाचे भरभरून कौतुक केले. तो म्हणाला, “वैभवने या हंगामात अत्यंत जबाबदारीने फलंदाजी करत सलामीची भागीदारी सांभाळली. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांसमोर त्याने ज्या पद्धतीचा खेळ दाखवला आहे, ते पाहता तो कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मला खात्री आहे की त्याला लवकरच हिंदुस्थानच्या वरिष्ठ संघातून खेळण्यासाठी बोलावणे येईल.” या सामन्यादरम्यान कागिसो रबाडाचा एक वेगवान बाउन्सर वैभवच्या हेल्मेटवर लागला होता, मात्र आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्याने मैदानावर टिकून राहत दाखवलेले धाडस कौतुकास्पद होते.

IPL 2026 – या वयात आम्हाला गोट्या अन् गल्ली क्रिकेटही नीट खेळता येत नव्हतं… वैभव सूर्यवंशीपुढे ‘महानायक’ नतमस्तक!

क्वालिफायर 2 मध्ये वैभवचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले असले, तरी या डावा दरम्यान त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. वैभवने या हंगामातील 16 सामन्यांमध्ये त्याने 48.50 च्या सरासरीने आणि 237.30 च्या तुफानी स्ट्राईक रेटने तब्बल 776 धावा कुटल्या आणि ‘ऑरेंज कॅप’वर आपले नाव कोरले. आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंचा सामना करत 1,000 धावा पूर्ण करण्याचा आंद्रे रसेलचा विक्रम वैभवने मोडीत काढला. याशिवाय, आयपीएलमध्ये सर्वात जलद 1,000 धावांचा टप्पा गाठणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या 23 डावांत ही कामगिरी केली, तर या यादीत शॉन मार्श (21 डाव) पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलमधील या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता ९ जूनपासून श्रीलंकेत सुरू होणाऱ्या त्रिकोणी मालिकेत वैभव ‘इंडिया अ’ संघाकडून कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.