अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, ‘गरज पडल्यास आम्ही

कोलकाता: तृणमूल कांग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee Attack) यांच्यावर सोनारपूर येथे झालेल्या कथित हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या (Abhishek Banerjee Attack) राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीएमसी प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करून अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. स्वतः ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा मोठा खुलासा केला.(Abhishek Banerjee Attack)

कोलकाता येथे पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “राहुल गांधी यांनी मला फोन केला होता आणि अभिषेकच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी मला सांगितले की, जर कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर त्यांना नक्की सांगा. गरज पडल्यास अभिषेक बॅनर्जी यांना उपचारासाठी हैदराबाद किंवा इतर कोणत्याही ठिकाणी नेण्याची व्यवस्था ते करू शकतात, असेही राहुल गांधींनी सांगितले.”(Abhishek Banerjee Attack)

Abhishek Banerjee Attack: सोनारपूरमधील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापले

दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनारपूर येथे निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसेतील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी अभिषेक बॅनर्जी गेले होते. याच दरम्यान एका जमावाने त्यांच्यावर कथितपणे हल्ला केला. या घटनेनंतर बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, टीएमसी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.(Abhishek Banerjee Attack)

Abhishek Banerjee Attack:  या प्रकरणी ५ जणांना अटक

अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तपन मायती आणि आकाश यांचा समावेश आहे. हे दोघेही घटनेशी संबंधित व्हायरल व्हिडिओमध्ये कथितपणे दिसले होते. पोलीस सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी करत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Abhishek Banerjee Attack:  गंभीर दुखापत नाही

दरम्यान, ‘बेल व्ह्यू क्लिनिक’ने जारी केलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार, ३० मे २०२६ रोजी ३८ वर्षीय अभिषेक बॅनर्जी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रिपोर्टनुसार, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, त्यांच्या छातीवर केवळ हलक्या जखमांचे निशाण आढळले आहेत.

तपासणीदरम्यान अभिषेक बॅनर्जी पूर्णपणे शुद्धीवर होते, सतर्क होते आणि नेहमीप्रमाणे संवाद साधत होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नॉर्मल सलाईन, रिंगर्स लॅक्टेट आणि वेदनाशामक (पेनकिलर) औषध देण्यात आले आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.