अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न क
बीड गुन्हे धनंजय देशमुख : बीड जिल्ह्यातील दिवंगत सरपंच संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Case) दिवसेंदिवस नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता थेट संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात (Beed Rural Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Beed Crime Dhananjay Deshmukh: अंगरक्षकाचे पिस्टल काढून जीवे मारण्याची धमकी
या संदर्भातील तक्रार दादा खिंडकर याचा सख्खा लहान भाऊ समाधान खिंडकर याने दिली आहे. तक्रारीनुसार, धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर हे एका हॉटेलवर जेवणासाठी आले होते. यावेळी समाधान खिंडकर जेवणासाठी बसला असताना धनंजय देशमुख यांनी त्यांच्या अंगरक्षकाजवळील पिस्टल काढून थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या अनपेक्षित प्रकारामुळे हॉटेल परिसरात एकच थरकाप उडाला.
Beed Crime Dhananjay Deshmukh: ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
समाधान खिंडकर याच्या तक्रारीवरून धनंजय देशमुख यांच्याविरोधात या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात 192/2026, कलम 109,352,351,(2),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . बीड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Beed Crime Dhananjay Deshmukh: दोन दिवसांपूर्वी काय घडले होते?
दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वी समाधान खिंडकर याने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार असलेला त्याचा स्वतःचा मोठा भाऊ दादा खिंडकर याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी दादा खिंडकरच्या तक्रारीवरून लहान भाऊ समाधान खिंडकरविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर हा संतोष देशमुख प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेत सक्रिय आहे. दादा खिंडकर हा आपल्या घरी असताना, त्याचा लहान भाऊ समाधान खिंडकर हा त्या ठिकाणी आला. त्याने जुन्या वादाची कुरापत काढत दादा खिंडकरला थेट बजावले की, “तू धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नकोस आणि संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस. ते प्रकरण मिटवून घ्यायला सांग.” यानंतर दादा खिंडकरने, “तुला याच्याशी काय करायचे आहे? तू तुझे काम कर,” असे उत्तर दिले होते. या उत्तराचा राग मनात धरून लहान भाऊ समाधान खिंडकर याने दादा खिंडकरला शिवीगाळ केली. या प्रकारानंतर दादा खिंडकरने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानंतर आता अवघ्या 48 तासांत समाधान खिंडकरने थेट संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांवर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने बीडमध्ये उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.