'टोयोटा किर्लोस्कर मोटर्स', ऑटो क्षेत्रातील भारत आणि जपानचा संयुक्त उपक्रम

टोयोटा आणि किर्लोस्करचा इतिहास

टोयोटा ग्रुपची स्थापना जपानमध्ये 1937 मध्ये किचिरो टोयोडा यांनी केली होती. सुरुवातीला ही कंपनी ऑटोमोबाईल कंपनी नसून हातमाग कंपनी म्हणून स्थापन करण्यात आली होती. पहिल्या महायुद्धानंतर जपानमधील वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश केला आणि 'टोयोटा मोटर कॉर्पोरेशन'ची स्थापना झाली. पुढे जाऊन, टोयोटाने 'टोयोटा प्रॉडक्शन सिस्टीम' (टीपीएस) विकसित केली, जी कमी किमतीत उच्च-गुणवत्तेच्या वस्तू आणि कारचे उत्पादन करणारी प्रणाली आहे. आज टोयोटा ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे.

किर्लोस्कर समूहाची स्थापना लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी 1888 मध्ये अगदी लहान वयात केली होती. बेळगावातील एका सायकल दुरुस्तीच्या दुकानातून सुरू झालेला हा उपक्रम औंध राज्यातील राजांकडून मिळालेल्या मदतीमुळे 'किर्लोस्कर ब्रदर्स' नावाच्या कंपनीत वाढला. सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे सुरू झालेल्या 'किर्लोस्करवाडी' कारखान्यात सुरुवातीला केवळ कृषी लोखंडी वस्तू आणि डिझेलचे उत्पादन केले जात असे. शेतीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी किर्लोस्करांनी मोठे यश मिळवले. पुढे, ९० च्या दशकात किर्लोस्करांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश केला.

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून TSEP द्वारे भविष्यातील रस्ता सुरक्षा कामगारांचे सक्षमीकरण

'टोयोटा किर्लोस्कर मोटर्स'ची स्थापना

1997 मध्ये, जपानची टोयोटा मोटर कॉर्पोरेशन आणि भारताचा किर्लोस्कर समूह यांनी एकत्र येऊन भारतात 'टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड' (TKM) नावाचा संयुक्त उपक्रम स्थापन केला. भारताच्या किर्लोस्कर समूहाचा संयुक्त उपक्रमात 11% हिस्सा आहे, तर टोयोटा मोटर कॉर्पोरेशनकडे 89% हिस्सा आहे. कंपनीचे मुख्यालय बंगलोर, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आले. त्यांचा मुख्य कारखाना बिदाडी कर्नाटक येथे आहे.

टोयोटा किर्लोस्करची प्रमुख उत्पादने

टोयोटा किर्लोस्कर त्यांच्या आरामदायी मजबूत SUV आणि हायब्रिड कारसाठी ओळखले जाते. इनोव्हा क्रिस्टा आणि इनोव्हा हिक्रॉस ही त्यांची भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बहुउद्देशीय वाहने (MPV) आहेत. त्यासोबतच, देशातील सर्वात यशस्वी आणि प्रीमियम एसयूव्ही फॉर्च्युनर आणि लीजेंड आहेत. Urban Cruiser Highrider ही हायब्रीड तंत्रज्ञान असलेली SUV आहे आणि Glanza, Hilux, Land Cruiser 300 सारखी इतर अनेक प्रसिद्ध मॉडेल्स कंपनीने भारतात ऑफर केली आहेत.

टोयोटा किर्लोस्कर मोटार वाहनांना ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? सप्टेंबर 2025 मध्ये किती वाहनांची विक्री झाली?

महाराष्ट्रात गुंतवणूक

टोयोटा किर्लोस्करने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (बिडकीन) औद्योगिक परिसरात एक भव्य नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. सुमारे 16,000 ते 21,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, दरवर्षी 1 लाख वाहने तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकल्पामुळे हजारो नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.

Comments are closed.