म्यानमारमध्ये भीषण स्फोट, 45 हून अधिक जणांचा मृत्यू; 100 हून अधिक घरांचे नुकसान
म्यानमारमध्ये भीषण स्फोटाची घटना रविवारी दुपारी घडली. या स्फोटात 45हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 70 ते 74 जण जखमी झाले आहेत. ईशान्य म्यानमारच्या शान राज्यातील नामखाम टाउनशिपमधील काउंगटुप गावात हा स्फोट झाला. आतापर्यंत 46 मृतदेह सापडले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटामुळे 100 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, खाणकामासाठी वापरण्यात येणारी स्फोटके ता’आंग नॅशनल लिबरेशन आर्मीच्या (TNLA) मालकीच्या एका इमारतीत ठेवण्यात आली होती. या स्फोटकांचा स्फोट झाला. बचावकार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Comments are closed.