IPL 2026: दोन खेळाडूंची खिताबी हॅट्ट्रिक! आरसीबीसह सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकत रचला इतिहास

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएलमध्ये इतिहास घडवला आहे. 2025 मध्ये पहिल्यांदा जेतेपद पटकावल्यानंतर, 2026 मध्येही शानदार कामगिरी करत आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. या विजयामुळे आरसीबीचे दोन खेळाडू, फिल साल्ट (Phill Salt and Suyash sharma) आणि सुयश शर्मा, यांनी एक दुर्मिळ ‘खिताबी हॅट्ट्रिक’ पूर्ण केली आहे. हे दोन्ही खेळाडू 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या विजयी संघाचा भाग होते. त्यानंतर 2025 आणि 2026 मध्ये आरसीबीकडून खेळताना त्यांनी पुन्हा विजेतेपद मिळवले. अशा प्रकारे, या दोन खेळाडूंनी सलग तीन वर्षे (2024, 2025 आणि 2026) चॅम्पियन टीममध्ये राहण्याचा विक्रम केला आहे.

आयपीएल 2026 मध्ये फिल साल्ट दुखापतीमुळे फक्त 6 सामने खेळू शकला. त्याने 33.66 च्या सरासरीने 202 धावा केल्या, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश होता. याउलट, 2025 च्या हंगामात त्याने 13 सामन्यांत 403 धावा काढल्या होत्या आणि 4 अर्धशतके झळकावली होती.

भारतीय फिरकी गोलंदाज सुयश शर्माला 2026 च्या हंगामात 12 सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने 9 विकेट्स घेतल्या. गेल्या हंगामात (2025) त्याने 14 सामन्यांत 8 विकेट्स मिळवल्या होत्या. दोन हंगामात एकूण 26 सामने खेळून त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत. आता पुढील हंगामासाठी आरसीबी या खेळाडूंना संघात कायम ठेवते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments are closed.